२५ वर्षांचा विश्वास संपादन करणारी धनश्री; ४० कोटींच्या ठेवींकडे झेप.... - Divyaprabhat News

Breaking News

Friday, September 4, 2026

२५ वर्षांचा विश्वास संपादन करणारी धनश्री; ४० कोटींच्या ठेवींकडे झेप....

 

रौप्य महोत्सवी वर्षात २६ व्या वर्षात यशस्वी पदार्पण; वर्धापन दिनानिमित्त श्री.सत्यनारायण महापूजेचे आयोजन...


मंगळवेढा/प्रतिनिधी

           सभासद, ठेवीदार, कर्जदार आणि हितचिंतकांच्या विश्वासाच्या भक्कम पाठबळावर धनश्री महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था, मंगळवेढा मर्या., सोलापूर जिल्हा शाखा पाठखळ यांनी आपल्या यशस्वी वाटचालीची २५ वर्षे पूर्ण केली आहेत. रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करत संस्थेने आता ४० कोटी रुपयांच्या ठेवींच्या दिशेने दमदार झेप घेतली आहे.



                गेल्या २५ वर्षांत संस्थेने आर्थिक क्षेत्रात आपला विश्वासार्ह ठसा उमटवत सभासदांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्याबरोबरच बचत आणि आर्थिक स्वावलंबनाला प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे. संस्थेच्या या यशस्वी वाटचालीत सभासद, ठेवीदार, कर्जदार आणि हितचिंतकांचे योगदान मोलाचे ठरले आहे.संस्थेच्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले असून, या मंगलमय सोहळ्यास सभासद, ग्राहक व हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

              विश्वासाची २५ वर्षे, समृद्धीची नवी दिशा!“उद्याच्या समृद्धीसाठी नेहमी तत्पर” या ध्येयातून संस्थेची वाटचाल सुरू असून, रौप्य महोत्सवी वर्षात संस्थेने आणखी भक्कम आर्थिक प्रगती करण्याचा संकल्प केला आहे. ४० कोटींच्या ठेवींचा टप्पा गाठण्याच्या दिशेने सुरू असलेली वाटचाल ही संस्थेवरील सभासद व ठेवीदारांच्या वाढत्या विश्वासाची पावती मानली जात आहे.२५ वर्षांचा विश्वास, पारदर्शक कारभार आणि सभासदहिताला प्राधान्य या बळावर धनश्री महिला पतसंस्था आता २६ व्या वर्षात नव्या जोमाने पदार्पण करीत आहे.या यशस्वी वाटचालीबद्दल संस्थेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ, सल्लागार मंडळ आणि कर्मचारी वृंद यांनी सर्व सभासद, ठेवीदार, कर्जदार व हितचिंतकांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.


Pages