सांगोला चडचण नव्या मार्गावर सांगोला आगाराची नवीन बस सेवा आजपासून.... - Divyaprabhat News

Breaking News

Wednesday, September 2, 2026

सांगोला चडचण नव्या मार्गावर सांगोला आगाराची नवीन बस सेवा आजपासून....

मंगळवेढा/प्रतिनिधी

                सांगोला आगाराकडून सांगोला- चडचण या नव्या मार्गावर एसटी बसची सुविधा सुरू करून सांगोला आगाराने मंगळवेढा परिसरातील प्रवाशांची गरज केल्याबद्दल नागरिकातून अभिनंदन केले जात आहे.वास्तविक पाहता मंगळवेढ्याच्या दक्षिण भागात सांगोला आगाराची सांगोला चडचण निंबोणी रेड्डे भोसे या मार्गावर एक बस सध्या सुरू असून दिवसभर अनेक फेऱ्या या मार्गावर सुरू असून  यातून सांगोला आगाराला चांगले उत्पन्न देखील मिळत असताना या पुन्हा नव्या मार्गावर सांगोला आगारातून नव्याने आजपासून सुरू केलेली एसटी बस सांगोला आंधळगाव पाटखळ हाजापूर भाळवणी तळसंगी मरवडे कात्राळ शिरढोण चडचण या मार्गावर ही बस सुरू करण्यात आली असून सांगोला येथून सकाळी 7 वाजून 45 मिनिटांनी सुटणार असून 30 बस सांगोला येथून सकाळी दहा वाजता सुटणार आहे.

 


                सांगोला आगाराने नव्या मार्गावर बस सुरू करून प्रवाशांना चांगली सुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे या बसचे मंगळवेढा तालुक्यातील भाळवणी येथे सरपंच लक्ष्‍मण गायकवाड यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले यावेळी माजी सरपंच ज्ञानेश्वर भंडगे ग्रामपंचायत सदस्य नामदेव चौगुले चंद्रकांत मोरे तानाजी आवळेकर संभाजी शिंदे वसंत माळी अंकुश शिंदे वसंत माने जालिंदर गायकवाड भिकन गायकवाड विठोबा लोखंडे महादेव लोखंडे नामदेव दोडके दत्तात्रेय साखरे मसुदेव वाडेकर लखन शिंदे जनार्दन गायकवाड दिलीप ढगे विशाल गायकवाड अजित जाधव शिवाजी तोरणे सिद्धेश्वर गायकवाड आलीसह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी या बसमधील वाहक शिंदे व चालक नरळे यांचा यावेळी सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या.


Pages