विरोधकांना धक्का लेंडवे माघारी, ताड यांचे पारडे जड,सौ.संगीताताई लेंडवे यांचा उमेदवारीतून माघार,सौ. दिपाली ताड यांना जाहीर बिनशर्त पाठिंबा.... - Divyaprabhat News

Breaking News

Thursday, January 29, 2026

विरोधकांना धक्का लेंडवे माघारी, ताड यांचे पारडे जड,सौ.संगीताताई लेंडवे यांचा उमेदवारीतून माघार,सौ. दिपाली ताड यांना जाहीर बिनशर्त पाठिंबा....






मंगळवेढा/प्रतिनिधी



             मंगळवेढा तालुक्यात सुरू असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लक्ष्मी दहिवडी जिल्हा परिषद गटातील संत चोखामेळा नगर गणात महत्त्वाची राजकीय घडामोड घडली आहे. तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या उमेदवार सौ. संगीताताई राजेंद्र लेंडवे यांनी आपली उमेदवारी अधिकृतरीत्या थांबवून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार सौ. दिपाली आनंद ताड यांना जाहीर बिनशर्त पाठिंबा दिला आहे.



             सौ.लेंडवे यांनी हा निर्णय घेताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पंढरपूर–मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय, दमदार व कर्तबगार आमदार श्री समाधान (दादा) आवताडे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. विकासाभिमुख धोरणे, स्थानिक पातळीवरील कामांची गती आणि मतदारसंघाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सक्षम नेतृत्वाची गरज लक्षात घेऊन आपण हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थित कार्यकर्ते व स्थानिक पदाधिकाऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत करत संत चोखामेळा नगर गणात भाजप उमेदवार सौ. दिपाली ताड यांचे पारडे अधिक जड झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. या पाठिंब्यामुळे स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांना सुरुवात झाली असून निवडणुकीत याचा थेट परिणाम दिसून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

              सौ.दिपाली ताड यांनी सौ.लेंडवे यांचे आभार मानत “हा पाठिंबा म्हणजे जनतेच्या विकासाच्या अपेक्षांना मिळालेली ताकद आहे.असे सांगितले. आगामी काळात मतदारसंघातील मूलभूत सुविधा, महिला सक्षमीकरण.पायाभूत विकास आणि सामाजिक उपक्रमांवर भर दिला जाईल.असेही त्यांनी स्पष्ट केले.

Pages