ब्रेकिंग न्यूज :- मंगळवेढ्यात परीक्षा घोटाळ्याचा भंडाफोड पहिल्याच पेपरला १० डम्मी विद्यार्थ्यांचा पर्दाफाश,नंदेश्वर केंद्रावर खळबळ.... - Divyaprabhat News

Breaking News

Friday, February 20, 2026

ब्रेकिंग न्यूज :- मंगळवेढ्यात परीक्षा घोटाळ्याचा भंडाफोड पहिल्याच पेपरला १० डम्मी विद्यार्थ्यांचा पर्दाफाश,नंदेश्वर केंद्रावर खळबळ....

 कॉपी नव्हे थेट बनावट उमेदवार केंद्र संचालकांची धडक कारवाई....

दिव्य न्यूज नेटवर्क

            मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथील श्री. बाळकृष्ण विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, परीक्षा केंद्र क्रमांक ३१/८४ येथे दि.२० फेब्रुवारी २०२६ रोजी मराठी विषयाच्या पहिल्याच पेपरदरम्यान धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.परीक्षा सुरू असताना केंद्र संचालक व उपकेंद्र संचालकांनी अचानक केलेल्या तपासणीत सुतार इंटरनॅशनल स्कूल लक्ष्मी दहिवडी येथील ९ विद्यार्थी व १ विद्यार्थिनी असे एकूण १० डम्मी परीक्षार्थी रंगेहाथ पकडले गेले. बनावट ओळखपत्रांच्या आधारे परीक्षा देण्याचा हा उघड प्रयत्न होता.



               प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता बोर्डाच्या नियमांनुसार तात्काळ कारवाई करण्यात आली असून संबंधितांविरोधात मंगळवेढा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.पहिल्याच पेपरला एवढ्या मोठ्या प्रमाणात डम्मी उमेदवार सापडल्याने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. परीक्षा व्यवस्थेच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले असले, तरी केंद्र प्रशासनाच्या तत्परतेमुळे मोठा घोटाळा उघडकीस आला आहे.

Pages