मंगळवेढा/प्रतिनिधी
मंगळवेढा पोलीस ठाण्यात नव्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक कुमार ढेरे हे रिक्त पदावर हजर झाले असून त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार नुकताच स्विकारला असून सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचे काम आपण करणार असल्याचे प्रसार माध्यमांशी बोलताना माहिती दिली.
मंगळवेढा पोलीस ठाण्यात तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश वाघमोडे यांची बदली झाल्याने ते पद रिक्त झाले होते. या पदावर सातारा येथून सहाय्यक पोलीस निरीक्षक कुमार ढेरे येथे हजर झाले असून त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्विकारला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक ढेरे हे महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून सन 2014 त्यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी आत्तापर्यंत मुंबई,गडचिरोली, कोल्हापूर,सातारा येथे आपली सेवा बजावली असून ते मुळचे कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. मंगळवेढा पोलीस ठाण्यात अधिकार्यांची रिक्त पदे भरल्याने कामाला गती मिळणार आहे.
