सभापती सौ.दिपाली ताड यांच्या हस्ते पाटखळमधील ७ नवोदित पोलिसांसह गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार..... - Divyaprabhat News

Breaking News

Sunday, May 17, 2026

सभापती सौ.दिपाली ताड यांच्या हस्ते पाटखळमधील ७ नवोदित पोलिसांसह गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार.....

मंगळवेढा/प्रतिनिधी

               मंगळवेढा तालुक्यातील पाटखळ गावाने यंदा शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत गावाचा नावलौकिक उंचावला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी जिद्दच्या आणि चिकाटीच्या जोरावर महाराष्ट्र पोलीस दलात यश मिळवत प्रेरणादायी कामगिरी केली आहे. यानिमित्ताने मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापती सौ. दिपाली आनंद (नाना) ताड यांच्या हस्ते तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.



               पाटखळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शारदा सिद्धनाथ विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश मिळवले. यावर्षी महाराष्ट्र पोलीस दलात निवड झालेल्या नाना कोळेकर, सौरभ बोराडे, गणेश बोराडे, श्रद्धा हाके, ज्ञानेश्वर हाके, सार्थक सावंत आणि शुभम डांगे या सात विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. ग्रामीण भागातून एकाच वेळी सात युवक-युवतींची पोलीस दलात निवड होणे ही गावासाठी अभिमानाचा आहे.याचबरोबर दहावी व बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला. इयत्ता दहावीमध्ये अस्मिता आवताडे हिने प्रथम क्रमांक, समुद्री उन्हाळे हिने द्वितीय क्रमांक तर अंजली उन्हाळे हिने तृतीय क्रमांक मिळवला. बारावी परीक्षेत विनायक काटकर याने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला असून प्राजंली उन्हाळे हिने द्वितीय तर वैष्णवी उन्हाळे हिने तृतीय क्रमांक मिळवला.

               या सत्कार समारंभाला पंचायत समिती सभापती सौ.दिपाली ताड, उद्योजक आनंद (नाना) ताड, खुपसंगी येथील कामसिद्ध विद्यालयाचे क्रीडाशिक्षक विठ्ठल बिले, सिद्धेश्वर सावंत, महिपती अनुसे, चंद्रकांत डांगे, हनुमंत गडदे, दत्ता ताड, समाधान उन्हाळे, समाधान ताड, दिनेश लुगडे, गणेश जगदाळे, बलभीम सावंत यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत ग्रामीण भागातील युवकांनी शिक्षण, क्रीडा आणि स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून मोठी स्वप्ने पाहावीत व ती पूर्ण करण्यासाठी मेहनत घ्यावी.

Pages