दिव्य न्युज नेटवर्क
पाटखळ येथील सरपंच ऋतुराज बिले यांचे वडील, कै. हर्षराज सुखदेव बिले यांच्या पाचव्या पुण्यस्मरणानिमित्त शुक्रवार, दि. १० एप्रिल २०२६ रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.गावच्या सेवेसाठी आयुष्य अर्पण करणारे, गरजूंना नेहमी आधार देणारे, गोरगरिबांचा आधारवड ठरलेले व माणुसकीचा वारसा जपणारे कै. बिले यांचे समाजासाठीचे योगदान आजही विसरता येणारे नाही. त्यांनी समाजासाठी जगलेले आयुष्य गावकऱ्यांच्या मनात कायम स्मरणात आहे. म्हणूनच त्यांची सेवा, त्यांचे विचार व त्यांच्या आठवणी आजही गावाच्या मनात जिवंत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
याप्रसंगी सकाळी १०.०० वाजता कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, भाविकांना अध्यात्मिक विचारांचा लाभ घेण्याची संधी मिळणार आहे. तसेच दुपारी १२.१५ वाजता पुष्पवृष्टी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.हे सर्व कार्यक्रम पाटखळ येथील त्यांच्या स्वगृही पार पडणार असून, परिसरातील नागरिक, नातेवाईक व मित्रपरिवार यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमास शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने तसेच पाटखळचे सरपंच ऋतुराज बिले व गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.
