श्री.सिद्धनाथाची चैत्र यात्रा,मंदिरात रंगरंगोटीचे काम युद्धपातळीवर सुरू.... - Divyaprabhat News

Breaking News

Friday, April 3, 2026

श्री.सिद्धनाथाची चैत्र यात्रा,मंदिरात रंगरंगोटीचे काम युद्धपातळीवर सुरू....


दिव्य  न्युज नेटवर्क

         मंगळवेढा तालुक्यातील पाटकळ परिसरातील पंचक्रोशीतील जागृत देवस्थान म्हणून ओळख असलेल्या श्री.सिद्धनाथ मंदिराची चैत्र महिन्यातील वार्षिक यात्रा दि. १० पासून सुरू होणार असून ती पाच दिवस चालणार आहे. या यात्रेचे औचित्य साधून मंदिर परिसरात विविध कामांना वेग आला आहे. यात्रा कमिटी व ग्रामस्थांच्या नियोजनातून दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेदरम्यान कीर्तन, भजन, पालखी सोहळा, तसेच विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यामुळे पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



           सध्या मंदिरात रंगरंगोटी व सुशोभीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू असून मंदिराला आकर्षक व कलरफुल रूप दिले जात आहे. मंदिर परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी ग्रामस्थांकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.यात्रा सुरळीत व उत्साहात पार पडावी यासाठी यात्रा कमिटी, ग्रामस्थ तसेच स्थानिक प्रशासन यांचे संयुक्त नियोजन सुरू असून सर्व तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. 

Pages