मंगळवेढा/प्रतिनिधी
तहसील कार्यालय मंगळवेढाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत समाधान अभियान अंतर्गत तिसऱ्या शिबिराला पाठखळ येथे जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.आजच्या तालुक्यातील तिसऱ्या शिबिराचे उदघाटन जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर, करुणा क्षीरसागर, पंचायत समिती सभापती दीपाली ताड, उपसभापती अर्जुन मल्लाळे, पंचायत समिती सदस्य विनायक यादव, आप्पासो निकम, सुरेश कांबळे, उपविभागीय अधिकारी बी.आर.माळी, उद्योजक आनंद ताड, श्रीकांत गणपाटील, जनार्धन शिवशरण, सरपंच ऋषीराज बिले व इतर लोकप्रतिनिधी उपस्थित होते. तसेच पंचायत समिती सदस्य विनायक यादव, जयश्री कवचाळे उपस्थित होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सभापती दीपाली ताड होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार मदन जाधव यांनी केले, तर आभार ग्राम महसूल अधिकारी अर्चना लोखंडे यांनी मांडले. शिबिराला पंचायत समिती, कृषी विभाग, आरोग्य विभाग, भूमी अभिलेख विभाग, पशू संवर्धन विभाग व महिला व बाल कल्याण विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.पाठखळ येथे हे शिबीर घेण्यात आले. या शिबिरामध्ये महसूल विभाग व इतर विभागाचे असे एकूण 25 स्टॉल उभारण्यात आले होते.
तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी एकाच छताखाली महसूल विषयक सेवा देताना दिसून आले तर तहसील कार्यालयातील सर्व शाखांमधील अधिकारी व कर्मचारी यांनी सुद्धा जनतेला तात्काळ सेवा उपलब्ध करून दिल्या.
मंगळवेढा तालुक्यात एकूण 6 शिबीर राबविण्यात येणार असून आज पाठखळ मंडळाच्या वतीने तिसऱ्या शिबिराचे आयोजन करण्यात आले. यापूर्वी मंगळवेढा, बोराळे, आंधळगाव, मारापूर या मंडळाच्या वतीने शिबिर यशस्वीरीत्या आयोजित करण्यात आले होते.आजच्या शिबिरास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत महसूल विषयक व इतर विभागांच्या सेवांचा लाभ घेतला. आजच्या शिबिरामध्ये महसूल विभागाच्या वतीने सर्वात जास्त म्हणजे 1968 लाभार्थ्यांना लाभ दिला, त्यामध्ये प्रामुख्याने, अभियानांतर्गत आजरोजी निकाली काढण्यात आलेल्या फेरफारांची संख्या - 201, अभियानांतर्गत 7/12 मधील दुरुस्ती संदर्भात स्वीकारण्यात आलेल्या अर्जांची संख्या - 04, अभियानांतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेल्या डिजिटल 7/12 उपलब्ध करून दिलेली संख्या - 860, अभियानांतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेल्या एकूण 8 अ उताऱ्यांची संख्या - 643 अभियानांतर्गत वितरित करण्यात आलेल्या प्रमाणपत्रांची संख्या - 256, अभियानांतर्गत एक खिडकी व्यवस्थेअंतर्गत निकाली काढण्यात आलेल्या अर्जांची संख्या - 02, अभियानांतर्गत भूसंपादन प्रकरणी कमी जास्त पत्रके तयार करून गाव दप्तर अद्यावत करण्यात आलेल्या प्रकरणांची संख्या - 1, अभियानांतर्गत अकृषक परवानगी दिलेल्या प्रकरणी कमी जास्त पत्रके तयार करून गाव दप्तर अद्यावत करण्यात आलेल्या एकूण प्रकरणांची संख्या -1 त्याचबरोबर संजय गांधी योजनेच्या वतीने 23, पुरवठा विभागाच्या वतीने 28, अभिलेख शाखेच्या वतीने मंडळातील 06 लाभार्थ्यांना शेतकुंडली वाटप, 03 लाभार्थ्यांना जन्म मृत्यू प्रमाणपत्र वाटप, मोफत वाळू वाटप आदेश 03, निवडणूक विभाग मतदार यादीत नाव समाविष्ट करणे 05, महा ई सेवा केंद्र मार्फत 182 असे महसूल विभागाच्या वतीने आज एकूण 1968 नागरिकांना विविध सेवांचा लाभ देण्यात आला.त्याचबरोबर पंचायत समिती -233, कृषी विभागाच्या -20, आरोग्य विभाग - 93, महिला व बाल विकास विभाग -101, पशुसंवर्धन विभाग -24, भूमी अभिलेख विभाग -02, उमेद अभियान - 15 असे आजच्या शिबिरात एकूण 2223 लाभार्थ्यांना एकाच दिवशी लाभ देण्यात आला.यानंतर दिनांक 17 एप्रिल रोजी मरवडे, 8 मे रोजी भोसे व 15 मे रोजी मंगळवेढा नगर परिषद हद्दीत होणाऱ्या शिबिरांना सुद्धा नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध महसूल विषयक व इतर विभागांच्या सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार मदन जाधव यांनी केले आहे.
आजचे शिबिर यशस्वी होण्यासाठी नायब तहसीलदार शीतल कन्हेरे, निवासी नायब तहसीलदार शिरीष शहापुरे, निवडणूक नायब तहसीलदार जयश्री स्वामी, मंडळ अधिकारी मौलवी, अर्चना लोखंडे व पाठखळ मंडळातील सर्व ग्राम महसूल अधिकारी, महसूल सेवक, स्वस्त धान्य दुकानदार, पोलीस पाटील, ग्रामपंचायत अधिकारी यांनी विशेष प्रयत्न केले. या शिबिराला तालुक्यातील इतर सर्व मंडळ अधिकारी, सर्व ग्राम महसूल अधिकारी आवर्जून उपस्थित होते.
सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी पंचायत समिती सभापती दीपाली ताड यांनी विशेष प्रयत्न केले. शिबिराच्या तयारी पासून ते शिबीर संपन्न होईपर्यंत स्वतः सर्व बाबीकडे लक्ष दिले तसेच त्यांनी पूर्ण वेळ शिबिरामध्ये हजेरी लावत सर्व स्टॉलला भेट देऊन अधिकारी, कर्मचारी यांचे मनोबल वाढवले.
***
