सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची नागपूर येथे बदली,एस.कार्तिकेयन सोलापूरचे नवे जिल्हाधिकारी.... - Divyaprabhat News

Breaking News

Thursday, April 2, 2026

सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची नागपूर येथे बदली,एस.कार्तिकेयन सोलापूरचे नवे जिल्हाधिकारी....

 

दिव्य न्युज नेटवर्क

            सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष व कार्यक्षम जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची नागपूर येथे जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. त्यांच्या कार्यकाळात सोलापूर जिल्ह्यात प्रशासनिक कामकाजात पारदर्शकता, गतिमान निर्णयप्रक्रिया आणि जनतेच्या समस्यांवर तत्परतेने उपाययोजना यामुळे त्यांनी विशेष ठसा उमटवला होता.




            दरम्यान, कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून कार्यरत असलेले एस. कार्तिकेयन यांची सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे सोलापूर जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.कुमार आशीर्वाद यांनी आपल्या कार्यकाळात महसूल, आपत्ती व्यवस्थापन, पाणीपुरवठा, तसेच विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत उल्लेखनीय कामगिरी बजावली. त्यांच्या बदलीमुळे प्रशासनातील एक सक्षम अधिकारी सोलापूरहून जात असल्याची भावना व्यक्त होत आहे.


Pages