महाप्रतापी योद्धे मल्हारराव होळकर यांची जयंती पाटखळ येथे उत्साहात साजरी.... - Divyaprabhat News

Breaking News

Monday, March 16, 2026

महाप्रतापी योद्धे मल्हारराव होळकर यांची जयंती पाटखळ येथे उत्साहात साजरी....


दिव्य न्यूज नेटवर्क

             मंगळवेढा तालुक्यातील पाटखळ येथे मराठा साम्राज्याचे पराक्रमी सरदार व लोकाभिमुख प्रशासक मल्हारराव होळकर यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच त्यांच्या पराक्रम आणि सामाजिक कार्याची माहिती उपस्थितांना देण्यात आली.या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर, मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापती दिपाली ताड, मंगळवेढा नगरपालिकेचे नगरसेवक नितीन मिटकरी उद्योजक बाळासाहेब ताड, माजी सरपंच शहाजी उन्हाळे, किसन ताड, हनुमंत गडदे, रामभाऊ वाघमोडे, तसेच बापूसाहेब मिटकरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर व पंचायत समिती सभापती दिपाली ताड यांचा उपस्थितांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

       


  

         यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतात सांगितले की, मल्हारराव होळकर हे मराठा साम्राज्यातील धाडसी आणि कुशल सेनानी होते. त्यांनी अनेक युद्धांमध्ये शौर्य गाजवत मराठा साम्राज्याच्या विस्तारात महत्त्वाची भूमिका बजावली. परंतु केवळ पराक्रमच नव्हे तर न्यायप्रिय प्रशासन, प्रजेप्रती असलेली कळकळ आणि समाजहिताचा दृष्टिकोन यासाठीही ते ओळखले जात होते. शेतकरी, व्यापारी आणि सामान्य नागरिकांच्या हिताचे निर्णय घेत त्यांनी सुशासनाचा आदर्श निर्माण केला. त्यांच्या कार्यामुळे मालवा प्रदेशात विकास आणि सामाजिक सलोखा निर्माण झाला.

            या कार्यक्रमाला बिरूदेव गडदे,संजय दवले (गुरुजी)ज्ञानेश्वर कोळेकर,आबा ताड, धर्मराज मोरे, ऊमेश शिरसागर,अण्णासाहेब चव्हाण (गुरुजी),रमेश आवताडे, ॲड.विकी मासाळ, तात्यासाहेब पाटील, नागेश मोटे, नामदेव पांढरे, आप्पा मेटकरी, मच्छिंद्र मेटकरी, रामभाऊ वाघमोडे, गौरव वाघमोडे, हणमंत गडदे, संतोष वाघमोडे, सुरेश वाघमोडे, सुरज मेटकरी, आनंद कोळेकर,दिनेश लुगडे, ज्ञानेश्वर कोळेकर,तानाजी सोलंनकर, उमेश क्षीरसागर, महादेव मेटकरी, अतुल कोळेकर,मारुती आवताडे,शिवाजी कोळेकर, पांडुरंग कोळेकर यांच्यासह पाटकळ व मेटकरवाडी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Pages