मंगळवेढ्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ ७ मार्चला..... - Divyaprabhat News

Breaking News

Friday, March 6, 2026

मंगळवेढ्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ ७ मार्चला.....


दिव्य न्यूज नेटवर्क....

             महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालय मंगळवेढा यांच्या वतीने ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ आयोजित करण्यात आले आहे. शनिवार दि.७ मार्च २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत हे शिबिर जोगेश्वरी मंगल कार्यालय, बायपास रोड, मंगळवेढा येथे पार पडणार आहे.



             या शिबिराच्या माध्यमातून तालुक्यातील शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या विविध महसुली अडचणींवर तत्काळ तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. सातबारा उतारा, फेरफार नोंदी, वारस नोंद, जमीन मोजणी, पानंद रस्ते, जमिनीचे वाद, तसेच विविध महसुली प्रमाणपत्रे आदी विषयांवरील प्रलंबित प्रकरणे या शिबिरात सोडविण्यात येणार असल्याची माहिती तहसील प्रशासनाकडून देण्यात आली आहे.



             नागरिकांनी आपल्या संबंधित कागदपत्रांसह शिबिरात उपस्थित राहून शासनाच्या या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार मदन जाधव मंगळवेढा यांच्या वतीने करण्यात आले आहे.महसूल विभाग नागरिकांपर्यंत थेट पोहोचून त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी अशा प्रकारचे समाधान शिबिर आयोजित करण्यात येत असून, या उपक्रमामुळे अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी व नागरिकांमध्ये या शिबिराबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

              तहसील कार्यालयाच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरात मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या समस्यांचे निराकरण करून घ्यावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Pages