पंचायत समिती सभापती पदाच्या निवडीची तारीख जाहीर १२ मार्च रोजी निवड प्रक्रिया पार पडणार... - Divyaprabhat News

Breaking News

Tuesday, March 3, 2026

पंचायत समिती सभापती पदाच्या निवडीची तारीख जाहीर १२ मार्च रोजी निवड प्रक्रिया पार पडणार...


दिव्य न्युज नेटवर्क...

                मंगळवेढा येथील पंचायत समिती सभापती पदासाठी इच्छुकांमध्ये हालचालींना वेग आला असून विविध पक्ष व गटांमध्ये रणनीती आखण्यास सुरुवात झाली आहे. या निवडीकडे तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय म्हणून पाहिले जात आहे.



             सभापतीपदासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया, छाननी व मतदान याबाबतचे अधिकृत वेळापत्रक प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहे. १२ मार्च रोजी सकाळी नियोजित वेळेत विशेष बैठकीत ही निवड पार पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.दरम्यान, कोणाच्या गळ्यात सभापतीपदाची माळ पडणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

Pages