दिव्य न्युज नेटवर्क
जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जवळा गटात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून या गटातून अतुल मालक पवार हे उमेदवार म्हणून रिंगणात उतरले आहेत. सध्या या गटात अटीतटीची लढत निर्माण झाली असली तरी स्थानिक पातळीवरील राजकीय घडामोडी, सामाजिक बांधिलकी आणि मतदारसंघातील संपर्क जाळे पाहता गटातील समीकरणे पवार यांच्या दृष्टीने सोयीस्कर ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे.गेल्या काही काळात पवार यांनी गावोगावी भेटी देत मतदारांशी थेट संवाद साधला आहे. स्थानिक प्रश्न, विकासकामे, पाणी, रस्ते, शैक्षणिक सुविधा यांसारख्या मुद्द्यांवर त्यांनी ठोस भूमिका मांडल्याने मतदारांमध्ये त्यांच्याविषयी सकारात्मक चर्चा सुरू आहे.
अनेक सामाजिक घटक व कार्यकर्ते त्यांच्याभोवती एकवटल्याचे दिसत असून यामुळे निवडणुकीतील त्यांची पकड मजबूत होत आहे.या गटात विरोधकही ताकदीने तयारी करत असले तरी संघटनात्मक बांधणी, कार्यकर्त्यांची फळी आणि स्थानिक पातळीवरील प्रभाव या बाबतीत पवार आघाडीवर असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. त्यामुळे जळगाव गटातील ही निवडणूक चुरशीची असली तरी सध्याच्या परिस्थितीत गटाची राजकीय घडी अतुल मालक पवार यांना अनुकूल बसत असल्याची चर्चा मतदारांमध्ये रंगू लागली आहे.
