- Divyaprabhat News

Breaking News

Wednesday, February 4, 2026


दिव्य प्रभात न्यूज नेटवर्क


           भोसे जिल्हा परिषद गटात सध्या राजकारणाचा तापमान अक्षरशः उकळत आहे. गावाच्या चावडीत,पाणवठ्यावर,शेताच्या बांधावर आणि चौकात सगळीकडे एकच चर्चा यंदा लढत भारी हाय रं!भाजपचे उमेदवार प्रदीप खांडेकर आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उमेदवार बसवराज पाटील यांच्यात थेट भिडंत होत असून, दोन्ही बाजूंकडून जोरदार राजकीय तालीम रंगलेली दिसते. गावोगावी प्रचाराची धुरळा भोसे गट दुष्काळी म्हणून ओळखला जातो. पाण्याचा प्रश्न,शेतीची अडचण,रस्त्यांची दुरवस्था या सगळ्यावरून प्रचारात आरोप-प्रत्यारोपांची फैर सुरू आहे.खांडेकर आपल्या पक्षाच्या ताकदीवर आणि विकासाच्या योजना सांगत मैदानात उतरले आहेत, तर बसवराज पाटील स्थानिक प्रश्नांवर थेट बोट ठेवत गावचा माणूस गावचा सवाल अशी भूमिका घेत जनतेत मिसळताना दिसत आहेत.

            दोन्ही बाजूंकडून सभांमध्ये जोरदार टोलेबाजी सुरू आहे.गावात वातावरण असे की, प्रत्येक वस्ती आपापला उमेदवार पुढे करण्यासाठी सज्ज झाली आहे.ही निवडणूक आता केवळ पक्षाची नाही, तर गावाच्या मान-सन्मानाची झाली आहे, असा सूर स्थानिकांमधून उमटतोय. मतदार ठरवणार खरा पैलवान भोसे जि.प. गटातील ही लढत आता प्रतिष्ठेची बनली आहे.

        


         दुष्काळी भागाला पाणी,शेतकऱ्याला आधार, तरुणांना काम आणि गावाला रस्ता देणारा प्रतिनिधी हवा हीच भावना जोर धरते आहे.गावोगावी रंगलेली ही राजकीय तालीम आता मतदानाच्या दिवशी कोणाला वरचढ करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.भोसे गटात यंदा मतदारच खरा पैलवान ठरणार, हे मात्र नक्की!

Pages