मंगळवेढा/प्रतिनिधी
लक्ष्मी दहिवडी जिल्हा परिषद गटातील निवडणूक आता अंतिम टप्प्यात पोहोचली असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार कोमलताई ढोबळे यांनी प्रचाराचा वेग कमालीचा वाढवला आहे. शेवटच्या टप्प्यात घरभेटी, कोपरा सभा आणि लहानमोठ्या बैठकींमधून मतदारांशी थेट संवाद साधण्यावर त्यांचा भर दिसून येत आहे.
गेल्या काही दिवसांत गटातील विविध गावांमध्ये कोमलताईंच्या प्रचाराला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे कार्यकर्त्यांकडून सांगितले जात आहे. स्थानिक विकास, मूलभूत सुविधा, महिलांचे प्रश्न, शेतकरी अडचणी आणि युवकांना संधी या मुद्द्यांवर त्या सातत्याने भूमिका मांडत आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रचारात स्थानिक प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील पूर्ण ताकदीने मैदानात उतरले असून बूथनिहाय नियोजनावर भर दिला जात आहे. अंतिम टप्प्यातील ही चुरशीची लढत असल्याने मतदारांची उत्सुकता वाढली आहे. लक्ष्मी दहिवडी गटात शेवटपर्यंत रंगत कायम राहणार, असे चित्र सध्या दिसत आहे.
