भोसे गटात राजकारणाला लागली धार! बसवराज पाटलांच्या पाठीशी अनिल सावंत उभे..... - Divyaprabhat News

Breaking News

Monday, February 2, 2026

भोसे गटात राजकारणाला लागली धार! बसवराज पाटलांच्या पाठीशी अनिल सावंत उभे.....

 

 विरोधकांच्या छातीत धडकी......

दिव्य प्रभात न्यूज नेटवर्क

                भोसे गटात सध्या राजकीय वाऱ्याची दिशा सरळ बसवराज पाटलांकडे वळलेली दिसतेय. कारण काय तर, माजी पदाधिकारी आणि गटात दबदबा असलेले अनिल सावंत यांनी उघडपणे बसवराज पाटलांना पाठिंबा दिलाय.भाजपची अधिकृत टीम इथे नाही, मी माझ्या मर्जीने बसवराज पाटलांच्या पाठीशी उभा आहे,असा थेट खुलासा सावंत यांनी केल्याने गटात खळबळ उडालीये.गावोगावच्या बैठकीत, वाड्या-वस्त्यांवर, चावडीत एकच चर्चा आता पाटलांची ताकद दुप्पट झाली रे अनिल सावंत यांचा स्थानिक कार्यकर्त्यांवर जबर प्रभाव आहे. त्यांच्या शब्दाला गावात वजन आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचा कल झपाट्याने बसवराज पाटलांच्या दिशेने सरकत असल्याचं चित्र दिसतंय.


          

              विरोधक मात्र आता बुचकळ्यात पडलेत आतापर्यंत सोपी समजलेली लढत अचानक कडवी झालीये. काही विरोधी गोटात तर उघड बोललं जातंय ही साथ बसली तर समीकरणं उलटी फिरतील.गावकऱ्यांमध्येही चर्चा रंगलीये की बसवराज पाटलांच्या सभांना वाढती गर्दी दिसतेय, तर काही ठिकाणी विरोधकांचे कार्यक्रम फिके पडताना दिसतायत.राजकारणात शेवटच्या क्षणी कोण कुणाकडे वळेल सांगता येत नाही.

Pages