संत चोखामेळानगर पंचायत समिती निवडणुकीत दिपाली ताड प्रचार आघाडीवर..... - Divyaprabhat News

Breaking News

Monday, February 2, 2026

संत चोखामेळानगर पंचायत समिती निवडणुकीत दिपाली ताड प्रचार आघाडीवर.....

मतदारसंघात दिपाली ताड यांचा वाढता जनसंपर्क आणि मजबूत वातावरण.....

मंगळवेढा/प्रतिनिधी

               संत चोखामेळानगर परिसरात निवडणुकीचा माहोल तापलेला असताना प्रचाराच्या रणधुमाळीत मोठी तफावत स्पष्टपणे दिसून येत आहे. पंचायत समिती सदस्य पदासाठी दिपाली आनंद ताड यां उमेदवारांचा प्रचार जोरात, नियोजनबद्ध आणि जनतेपर्यंत पोहोचणारा दिसतोय; मात्र जिल्हा परिषदेच्या लक्ष्मी दहिवडी गटाच्या सदस्य पदासाच्या उमेदवार करुणा जनार्दन शिवशरण यांचा प्रचार पूर्णपणे मंदावलेला असल्याने मतदारांमध्ये तीव्र नाराजी उसळली आहे.गावोगावी भेटी, घरभेट मोहीम, लहानमोठ्या बैठका, युवकांची सक्रिय फौज आणि महिलांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न पंचायत समिती उमेदवारांनी प्रचारात जिव ओतला आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती आणि संवाद पाहून “हा उमेदवार आपलाच” अशी भावना मतदारांमध्ये निर्माण होताना दिसते. त्यामुळे पंचायत समिती निवडणुकीचा माहोल पूर्णपणे रंगलेला आहे.

                  परंतु दुसरीकडे जिल्हा परिषद गटात वेगळीच चित्र दिसते. प्रचारात स्पष्ट दिशेचा अभाव, गावपातळीवर समन्वय नसणे, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आणि मतदारांशी थेट संपर्क कमी यामुळे जिल्हा परिषद उमेदवारांचा गट पूर्णपणे गोंधळलेला असल्याचे चित्र आहे. मत मागायला कोणी येतच नाही, निवडणुकीत उभे आहेत हेच माहिती नाही अशी थेट प्रतिक्रिया अनेक नागरिकांकडून व्यक्त होत आहे.



              लोकांच्या मते निवडणुकीच्या वेळीच आठवण येणारे नेतृत्व आम्हाला नको. आमच्या प्रश्नांवर वर्षभर काम करणारे प्रतिनिधी हवे. पाणी, रस्ते, रोजगार, शेतकऱ्यांचे प्रश्न, शाळांची अवस्था यावर स्पष्ट भूमिका न मांडता केवळ नावापुरता प्रचार करणाऱ्या जिल्हा परिषद गटावर लोकांमध्ये संताप वाढताना दिसतो.

           राजकीय वर्तुळातही चर्चा रंगली आहे की, पंचायत समिती पातळीवर उमेदवार आक्रमक आणि संघटित आहेत, तर जिल्हा परिषद पातळीवर नियोजनाचा पूर्ण अभाव आहे. याचा थेट परिणाम मतदानावर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.एकंदरीत, संत चोखामेळानगरमध्ये सध्या अशी स्थिती आहे.पंचायत समितीच्या दिपाली आनंद ताड प्रचारात वेग, तर जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार करुणा जनार्धन शिवशरण दिशाहीन धावपळ!जनतेचा मूड स्पष्ट आहे: काम करणाऱ्यांनाच संधी, केवळ नावापुरत्या नेतृत्वाला नकार!

Pages