मंगळवेढा/प्रतिनिधी
एक दिवस गावासाठी मोहिमे अंतर्गत श्री.संत दामाजी पुतळा परिसराची दर शनिवारी स्वच्छता करण्यात येत आहे.या मोहिमे अंतर्गत मंगळवेढा शहरातील मंदिर किंवा एका परिसराची स्वच्छता करण्यात येते.शनिवारी सकाळी 7 ते 8 या वेळेत दामाजी चौकातील श्री.संत दामाजी पुतळा परिसराची स्वच्छता करण्यात आली.मंगळवेढा शहरातील जागृक नागरिक व विविध सामाजिक संस्था यांना एकत्र घेऊन उपक्रम राबवला जात आहे.श्री.संत दामाजी पुतळा चौकात आहे व वाहतूक जास्त असल्यामुळे धुळीचे प्रमाण जास्त आहे त्यामुळे संपूर्ण परिसर स्वच्छ करून पाण्याने पुतळा स्वच्छ करण्यात आला.
सदर परीसरात वाढदिवसानिमित्त झाडांच्या कुंड्या भेट देऊन सुशोभीकरण करण्यात येत आहे. मंगळवेढे भूमी संतांची असून शहरातील प्रत्येक संतांच्या मंदिर परिसराची स्वच्छता करणे गरजेचे आहे.यासाठी समस्त मंगळवेढकरांनी सहभाग नोंदवावा असे आव्हान देखील यावेळी करण्यात आले.सदर मोहिमेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.या मोहिमेमध्ये स्वप्निल फुगारे,अंबादास गुंगे,आण्णासाहेब देशमुख,स्वप्निल टेकाळे,सतीश दत्तू यांनी सहभाग नोंदवला
