भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ माचनूर येथे आज प्रचार शुभारंभ व जाहीर सभा.... - Divyaprabhat News

Breaking News

Friday, January 23, 2026

भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ माचनूर येथे आज प्रचार शुभारंभ व जाहीर सभा....

मंगळवेढा/प्रतिनिधी
सोलापूर जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण सार्वत्रिक निवडणूक 2026 च्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे व जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रचार शुभारंभ व जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. आज शुक्रवार दि.२३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९:०० वाजता श्री.सिद्धेश्वर मंदिर माचणूर येथे प्रचाराचा नारळ फोडून भव्य शुभारंभ करण्यात येणार आहे.
संपूर्ण राज्यामध्ये होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा भाग म्हणून सदर निवडणूक संदर्भात या प्रचार शुभारंभाचे व जाहीर आयोजन सभेचे करण्यात आले आहे. तरी तालुक्यातील जास्तीत जास्त मतदार बंधू-भगिनी पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Pages