नुतन जिल्हा पोलीस अधिक्षकांची मंगळवेढा पोलीस ठाण्याला धावती भेट... - Divyaprabhat News

Breaking News

Monday, September 9, 2024

नुतन जिल्हा पोलीस अधिक्षकांची मंगळवेढा पोलीस ठाण्याला धावती भेट...

मंगळवेढा/प्रतिनिधी मंगळवेढा पोलीस ठाण्याला नुतन पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी शनिवार दि.7 रोजी रात्री 11.15 वाजता गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर भेट देवून योग्य त्या सुचना केल्याचे पोलीस सुत्रांकडून सांगण्यात आले.
सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांचा धावता दौरा माळशिरस पोलीस ठाण्याला होता. तद्नंतर त्यांनी सोलापूरकडे जाताना शनिवारी रात्री 11.15 वाजता अचानक मंगळवेढा पोलीस ठाण्याला भेट दिली. यावेळी त्यांनी पोलीस ठाण्यातील नगदी मुद्देमाल, क्राईम ब्रॉन्च,ठाणे अंमलदार कक्ष गोपनीय विभाग,बिनतारी संदेश कक्ष आदी ठिकाणी भेट देवून त्यांनी माहिती जाणून घेतली. सध्या गणेशोत्सव सुरु असल्याने हा उत्सव शांततेत पार पडावा या दृष्टीने त्यांनी मार्गदर्शनपर काही सुचना पोलीस अधिकार्‍यांना केल्याचे सांगण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक महेश ढवाण,सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश वाघमोडे,पोलीस उपनिरीक्षक विजय पिसे, पुरुषोत्तम धापटे, गोपनीय विभागाचे पोलीस हवालदार दिगंबर गेजगे, क्राईम विभागाचे महिला पोलीस हवालदार वंदना अहिरे यांच्यासह अन्य कर्मचारी उपस्थित होते.

Pages