मंगळवेढा/प्रतिनिधीपोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण व मंगळवेढा पोलीस ठाणे यांच्या संयुक्त पथकाने मंगळवेढा तालुक्यातील शेलेवाडी गावच्या शिवारात एका वस्तीवर तिरट नावाचा जुगार खेळणार्या अड्डयावर नुतन पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने छापा टाकून 4 लाख 3 हजार 458 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून दत्तात्रय लवटे,गोपाळ मासाळ(तनाळी),सतीश कोपे(तावशी),संतोष इंगळे,गणेश चव्हाण(शेलेवाडी),विजय यादव,गजानन माने(मारापूर),नंदकुमार सरगर,बालाजी सरगर (अकोला रोड सलगर वस्ती,मंगळवेढा),अड्डाचालक मनोज चव्हाण(शेलेवाडी) आदी दहा जणांवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदयान्वये गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी,शेलेवाडी येथील शिवारात चव्हाण वस्तीवर पत्र्याच्या शेडमध्ये काही इसम चोरून 52 पानाच्या पत्त्यावर पैशाची पैज लावून तिरट नावाचा जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती नव्याने दाखल झालेले पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांना मिळताच त्यांनी त्यांच्या कार्यालयाचे पथक सदर घटनास्थळी दि.20 ऑगस्ट रोजी 9.30 वा.पाठवून खातर जमा केली असता पथकातील अधिकारी व अंमलदारांनी पत्राशेडच्या दरवाजातून आत प्रवेश केल्यावर 9 लोक गोलाकार बसून पत्त्याची पाने व रोख रक्कम हातामध्ये घेवून तिरट नावाचा जुगार खेळत असल्याचे पोलिस पथकाला दिसून आले.पोलिस पथकाने तात्काळ वरील आरोपींना ताब्यात घेवून मंगळवेढा पोलिस ठाण्यात हजर केले.घटनास्थळी पोलिसांना 9 मोबाईल,8 मोटर सायकली, कुलर,टेबल,66 हजार 458 रु.रोख रक्कम असा एकूण 4 लाख 3 हजार 458 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. नव्याने दाखल झालेले पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी मंगळवेढयात अवैध व्यवसायावर टाकलेल्या धाडीमुळे सर्वसामान्य नागरिकांतून त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतूक होत असून भविष्यात यापुढेही पोलिस अधिक्षकांनी आपल्या कार्याची चुणूक कायम ठेवून तालुक्यातील अवैध धंदे हद्दपार करावेत अशी जनतेतून आग्रहाची मागणी पुढे येत आहे. ही कामगिरी कोल्हापूर विभागाचे पोलिस महानिरिक्षक सुनिल फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी,अतिरिक्त पोलिस अधिक्षक प्रितमकुमार यावलकर,डी.वाय.एस.पी.विक्रांत गायकवाड,पोलिस निरिक्षक महेश ढवाण,पोलिस अधिक्षक पथकातील पोलिस निरिक्षक डी.एस.बोरीगिड्डे,पो.का.कृष्णा धनवे,रोहिदास गावित,चंद्रकांत चौधरी,चालक संदेश गाडे व मंगळवेढा पोलिसांनी केली आहे.याचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.
अड्डा चालकासह दहा जणांवर गुन्हे दाखल .......
