बैल पोळ्याच्या सणात शेतकऱ्यांनी सजविले लाडके सर्जा-राजा - Divyaprabhat News

Breaking News

Thursday, September 10, 2026

बैल पोळ्याच्या सणात शेतकऱ्यांनी सजविले लाडके सर्जा-राजा

शिरगाव येथे विशाल घाडगे यांनी पारंपरिक पद्धतीने बैलांचे पूजन करून साजरा केला पोळा...

पंढरपूर /प्रतिनिधी

           शिरगाव ता.पंढरपूर येथील शेतकऱ्यांच्या जीवनात शेतीच्या कामात मोलाची साथ देणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा बैल पोळा सण शिरगाव, ता. पंढरपूर येथे उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विशाल रामेश्वर घाडगे यांनी आपल्या लाडक्या बैलांना स्वच्छ अंघोळ घालून त्यांची आकर्षक सजावट केली.बैलांच्या शिंगांना रंगरंगोटी करून त्यावर आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. गळ्यात फुलांच्या माळा अंगावर विविध रंगांची सजावट आणि पारंपरिक पद्धतीने केलेल्या श्रृंगारामुळे बैलजोड्या लक्षवेधी ठरल्या. शेतातील बैलांचे पूजन करून त्यांना नैवेद्य दाखविण्यात आला.

 शिरगाव येथे बैल पोळ्यानिमित्त विशाल रामेश्वर घाडगे यांनी सजविलेल्या बैलांचे पूजन केले.

            शेतीच्या मशागतीपासून विविध कामांमध्ये शेतकऱ्यांना वर्षानुवर्षे साथ देणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा बैल पोळा या सणातून जपली जाते. आधुनिक यंत्रांचा वापर वाढला असला तरी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मनातील बैलांविषयीचे प्रेम आणि जिव्हाळा आजही कायम असल्याचे पोळा सणाच्या निमित्ताने दिसून आले.



Pages