दिव्य न्यूज नेटवर्क
ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श अंगीकारण्याचा युवकांचा संकल्प १९ फेब्रुवारी सिद्धनाथ वेलनेस सेंटर, पाटखळ येथे पहाटे सहा वाजता ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना देऊन जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी गावातील सर्व तरुण व ज्येष्ठ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. पहाटेच्या शांत वातावरणात उपस्थितांनी भगवे ध्वज फडकावत “शिवरायांचा जयघोष” केला. यामुळे संपूर्ण परिसरात राष्ट्रभक्ती व प्रेरणेचे वातावरण निर्माण झाले.यावेळी उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याचा ऐतिहासिक आढावा घेतला. शिवरायांनी प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्याची स्थापना करून स्वाभिमान,शौर्य आणि लोककल्याणकारी राज्यव्यवस्थेचा आदर्श निर्माण केला. धर्मनिरपेक्ष दृष्टिकोन, स्त्रीसन्मान, न्यायप्रिय प्रशासन आणि प्रजेच्या सुरक्षेसाठी घेतलेले धाडसी निर्णय हे आजही समाजासाठी मार्गदर्शक आहेत, असे मत व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमात यावेळी पंचायत समितीचे नूतन सदस्य बाळासाहेब ताडपाटखळ ग्रामपंचायतचे सरपंच ऋतुराज बिले-पाटील, भैरवनाथ शुगर चे जनरल मॅनेजर बाळासाहेब शिंदे, उद्योजक धर्मराज मोरे,दत्तात्रय सावत.शाम मोरे,हनुमंत गडदे,नामदेव ताड,बापू खटकाळे,सचिन जगदाळे,सुमित सावंत,युवराज घोडके,समाधान इंगोले,प्रवीण मोरे,दत्तात्रय माने,रोहित बोळे तसेच गावकरी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
युवकांनी शिवरायांचे विचार केवळ पूज्य मानून न थांबता ते दैनंदिन जीवनात अमलात आणण्याचा संकल्प केला. शिस्त, वेळेचे पालन, व्यसनमुक्त जीवन, आरोग्य संवर्धन, सामाजिक एकोपा आणि राष्ट्रसेवा या मूल्यांचा अंगीकार करण्याचे आवाहन करण्यात आले. सिद्धनाथ वेलनेस सेंटर येथे झालेल्या या उपक्रमामुळे तरुण पिढीमध्ये देशप्रेम व सामाजिक जबाबदारीची भावना अधिक दृढ झाली आहे.या जयंती कार्यक्रमातून ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श नव्या पिढीपर्यंत पोहोचवून समाजात सकारात्मक परिवर्तन घडवण्याचा संदेश देण्यात आला.
