दिव्य न्यूज नेटवर्क
संत चोखामेळानगर पंचायत समिती गणातून दिपाली आनंद ताड यांनी भरघोस मताधिक्याने विजय संपादन करत आपल्या नेतृत्वाची छाप पाडली. त्यांच्या या दणदणीत विजयाबद्दल शिवनेरी परिवारातर्फे भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.
या सत्कार सोहळ्यावेळी शिवनेरी परिवाराचे सर्वेसर्वा दिगंबर सावंत, ग्रामपंचायत माजी सदस्य दत्तात्रय सावंत, नागेश सावंत, रोहित सावंत तसेच पाटकळ ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच ऋतुराज बिले-पाटील उपस्थित होते. याशिवाय उद्योजक धर्मराज मोरे, हनुमंत गडदे युवा उद्योजक पिंकू हजारे, रामभाऊ वाघमोडे आणि गावातील अनेक उद्योजक, प्रतिष्ठित नागरिक व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात माळाप्पा कोळेकर, उमेश शिरसागर, गौरव वाघमोडे, बाळू डांगे,मनोहर डांगे, बबन डांगे, धर्मराज मोरे, विशाल चव्हाण, स्वप्निल सावंत तसेच इतर ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिपाली ताड यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी बोलताना दिपाली ताड यांनी मतदारांचे आभार मानत, “हा विजय माझा नसून संत चोखामेळानगर गणातील जनतेचा आहे. विकासकामांना प्राधान्य देत पारदर्शक व जनहिताचे कार्य करण्यासाठी मी कटिबद्ध आहे,” असे सांगितले. त्यांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.
शिवनेरी परिवाराच्या वतीनेही त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण असून, ग्रामस्थांनी जल्लोष करत विजयाचा उत्सव साजरा केला.
