भोसे जि.प. गटात विकासाचा चेहरा कोण?
दुष्काळी दक्षिण भागासाठी बसवराज पाटील यांच्याकडे आशेची नजर....
“कामाचा हिशोब द्या!”घोषणांना कंटाळलेली जनता,आता निकाल लावणार ....
मंगळवेढा/प्रतिनिधी
मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागाला “दुष्काळाचा कायमचा पत्ता” अशी ओळख मिळाली असताना भोसे जिल्हा परिषद गटात आता निवडणूक म्हणजे फक्त सत्ता नव्हे तर जगण्याच्या हक्काची लढाई बनली आहे.या पार्श्वभूमीवर बसवराज पाटील आणि प्रदीप खाडेकर यांच्यातील लढत केवळ राजकीय नसून जनतेच्या संयमाची अंतिम परीक्षा ठरत आहे.
वर्षानुवर्षे पाण्यासाठी टँकर शेतीसाठी आकाशाकडे नजर तर रस्त्यांसाठी आश्वासनांचा पाऊस एवढ्यावरच दक्षिण मंगळवेढ्याचा विकास थांबलेला दिसतो.नळयोजना अर्धवट शेततळी कागदावर रोजगार हमी योजनांमध्ये विलंब आणि युवकांना गाव सोडून स्थलांतर या वास्तवाने मतदारांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
लोकांचा थेट सवाल...
निवडणुकीत हात जोडून येतात जिंकले की दिसेनासे होतात हा सूर भोसे गटात स्पष्ट ऐकू येतो.शेतकरी म्हणतो पाण्याशिवाय विकास म्हणजे फक्त भाषण तर युवक म्हणतात नोकरी नाही उद्योग नाही मग भविष्य कुठे?
भोसे गटात पाटील विरुद्ध खाडेकर वचनांचा पाऊस की कामांचा पुरावा?बसवराज पाटील विकासाचा अनुभव आणि प्रशासनाशी सुसंवाद यावर भर देत आहेत तर प्रदीप खाडेकर स्थानिक प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेत नवे नेतृत्व नवा विचार अशी भूमिका मांडत आहेत.
पण मतदारांचा प्रश्न स्पष्ट आहे ...
“विकासाचे पोस्टर नको, पाण्याचा नळ सुरू हवा.” भागासमोरील प्रमुख अडचणी कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना रखडलेली शेतीसाठी सिंचनाची अपुरी साधने खड्डेमय रस्ते आणि वाहतूक अडचणी युवकांसाठी रोजगार संधींचा अभाव आरोग्य व शिक्षण सुविधा अपुऱ्या यंदा मतदार ठरवणार “खऱ्या कामाचा उमेदवार"भोसे जि.प. गटात यावेळी वातावरण वेगळे आहे. जात, गट, पक्ष यापेक्षा “कोण प्रश्न सोडवणार?” हा मुद्दा आघाडीवर आहे. मतदार आता फक्त आश्वासनांवर विश्वास ठेवायला तयार नाहीत त्यांना ठोस कृती आराखडा आणि वेळेत पूर्ण होणारे काम हवे आहे. दक्षिण मंगळवेढ्याचा इतिहास दुष्काळाचा असला तरी भविष्य विकासाचे असू शकते पण त्यासाठी निवडून येणारा प्रतिनिधी फोटोसेशनचा नव्हे तर मैदानात उतरणारा हवा अशीच भावना जनतेत व्यक्त होत आहे.प्रदीप खाडेकर विकासाचा अनुभव आणि प्रशासनाशी सुसंवाद यावर भर देत आहेत, तर बसवराज पाटील स्थानिक प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेत “नवे नेतृत्व, नवा विचार” अशी भूमिका मांडत आहेत.पण मतदारांचा प्रश्न स्पष्ट आहे.
विकासाचे पोस्टर नको,पाण्याचा नळ सुरू हवा.कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना रखडलेली.शेतीसाठी सिंचनाची अपुरी साधने.खड्डेमय रस्ते आणि वाहतूक अडचणी.युवकांसाठी रोजगार संधींचा अभाव आरोग्य व शिक्षण सुविधा अपुऱ्या असे अनेक प्रश्न येथील जनता विचारत आहे.
