मंगळवेढ्याच्या दक्षिण भागातून परिवर्तनाची ज्योत पेटवणारी महिला :– दिपाली ताड - Divyaprabhat News

Breaking News

Monday, January 26, 2026

मंगळवेढ्याच्या दक्षिण भागातून परिवर्तनाची ज्योत पेटवणारी महिला :– दिपाली ताड

 



दिव्य प्रभात न्यूज नेटवर्क


               आजच्या काळात बेरोजगारी ही मोठी समस्या बनली आहे. अनेक युवक-युवती शिक्षण पूर्ण करूनही रोजगाराच्या संधींपासून वंचित राहतात. काम नसल्यामुळे काही तरुण सोशल मीडियामध्ये गुंतून पडताना दिसतात. अशा परिस्थितीत स्वतःच्या हितापेक्षा समाजहिताला प्राधान्य देणारे काही लोक आशेचा किरण ठरतात. अशाच समाजाभिमुख व्यक्तिमत्त्वांपैकी एक नाव म्हणजे दिपाली ताड आणि त्यांचे पती आनंद उर्फ बाळासाहेब ताड. “केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे” या उक्तीप्रमाणे कार्य करणारे ताड दांपत्य समाजसेवेच्या क्षेत्रात प्रेरणादायी कार्य करत आहे. स्पर्धात्मक युगात स्वतःची प्रगती साधतानाच समाजातील इतर घटकांनाही पुढे नेण्याची त्यांची धडपड समाजात सकारात्मक बदल घडवते आहे.



ग्रामीण भागातून समाजसेवेची वाटचाल..

         आनंद ताड यांचा जन्म पाटकळ या ग्रामीण गावात एका सामान्य कुटुंबात झाला. लहानपणापासूनच त्यांना सामाजिक प्रश्नांची जाणीव होती. शिक्षणापासून वंचित राहणारी मुलं, शेतकऱ्यांच्या अडचणी, बेरोजगारीशी झुंजणारी तरुणाई – या सगळ्या गोष्टी त्यांना सतत अस्वस्थ करत. उद्योग-व्यवसायात यश मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या जन्मभूमीच्या विकासासाठी स्वतःला झोकून दिले.

           शिक्षण आणि रोजगारासाठी भरीव योगदान पाटकळ पंचक्रोशीतल्या अनेक शैक्षणिक संस्थांना त्यांनी आर्थिक मदत करून शिक्षणाची गंगा वाहती ठेवली. पालकांमध्ये शिक्षणाविषयी जागरूकता निर्माण केली. तरुणांना स्वावलंबी बनवण्यासाठी त्यांनी मत्स्योद्योग सुरू केला. याशिवाय दुग्ध व्यवसायासाठी गाई घेण्यास आर्थिक मदत करून अनेक युवकांना स्वतःच्या पायावर उभे केले.

दुष्काळग्रस्त भागात मानवतेचा झरा....

               पाटकळ आणि आसपासच्या गावांमध्ये वारंवार भेडसावणाऱ्या दुष्काळाच्या समस्येवर त्यांनी मोफत पाणी वाटप हा महत्त्वपूर्ण उपक्रम राबवला. पिण्याच्या पाण्यासाठी माता-भगिनींना करावी लागणारी वणवण या उपक्रमामुळे कमी झाली. कोणताही स्वार्थ न ठेवता लाखो रुपये खर्च करून त्यांनी माणुसकीचा खरा अर्थ दाखवून दिला.तरुणांसाठी आदर्श व्यक्तिमत्त्व“जिथे गरज तिथे आनंद ताड” हे जणू सूत्रच बनले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक युवक समाजकार्यात सक्रिय झाले आहेत. त्यांचे जीवन समाजासाठी झिजणाऱ्या दीपस्तंभासारखे आहे.

   


     

      महिला सक्षमीकरणासाठी दिपाली ताड यांची धडपड आनंद ताड यांच्यासोबतच दिपाली ताड देखील समाजकार्यात सक्रिय आहेत. विशेषतः महिला सक्षमीकरण आणि महिलांसाठी लघुउद्योग निर्मिती या क्षेत्रात त्या काम करत आहेत. महिलांच्या हाताला रोजगार मिळावा, त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात यासाठी त्यांची सातत्यपूर्ण धडपड सुरू आहे.त्यांच्या कार्याची दखल घेत भारतीय जनता पक्षाकडून त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी महिलांसाठी, युवकांसाठी आणि विद्यार्थिनींसाठी रोजगारनिर्मितीचे कार्य अधिक व्यापक करण्याचा निर्धार व्यक्त केला.



परिवर्तनाची दिशा

दिपाली ताड दांपत्याचे कार्य हे केवळ समाजसेवा नाही, तर ग्रामीण भागातून उभा राहणाऱ्या परिवर्तनाचा आदर्श आहे. त्यांच्या कार्यामुळे अनेकांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण झाला आहे.अशा व्यक्तिमत्त्वांमुळेच समाजात खऱ्या अर्थाने बदल घडतो.



Pages