मंगळवेढा/प्रतिनिधी
मंगळवेढा तहसील विभागातर्फे "महसूल पंधरवडा" साजरा करण्यात येत आहे. महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा आणि विभागाव्दारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजना याबाबत नागरिकांना अधिकाधिक माहिती प्राप्त होऊन त्यांना योग्य लाभ घेता यावा या उद्देशाने दि.12 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता पाटखळ येथे महसूल पंधरवडा साजरा करण्यात येत आहे.
'एक हात मदतीचा–दिव्यांगांच्या कल्याणाचा' हा कार्यक्रम आयोजित केला आहे.दिव्यांग व्यक्तींकरीता शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती यामध्ये देण्यात येणार आहे. तसेच दिव्यांगांना UDID कार्ड, अनाथ मुलांना प्रमाणपत्र, दिव्यांगांना व्हील चेअर, जयपूर फूट, एम.आर. कीट, इलेक्ट्रीक स्टीक, कानाचे मोल्ड व शासनाच्या विविध योजना याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी तहसीलदार मदन जाधव, नायब तहसीलदार चंद्रकांत हेडगिरे व निवडणूक नायब तहसिलदार श्रीमती जयश्री स्वामी हे मार्गदर्शक करणार आहेत.

सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रहार अपंग संघटनेचे तालुकाध्यक्ष समाधान हेंबाडे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच सदर कार्यक्रमास ब्रह्मपुरीचे दिव्यांग व्यवसायिक सर्जेराव पाराध्ये, आंधळगावचे दिव्यांग शेतकरी सत्यवान लेंडवे, दिव्यांग वक्ते रविराज खिलारे, शिक्षक अमोल कुलकर्णी, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी नरळे हे मार्गदर्शन करणार आहेत. मंगळवेढा तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधवांनी या सुवर्णसंधीचा अवश्य लाभ घ्यावा.या कार्यक्रमात दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन करणे व प्रोत्साहित करणे व त्यांच्याशी निगडीत असलेल्या कृषी, पंचायत समिती व महसूल विभागाच्या योजनेबद्दल व दिव्यांगांसंबंधी सर्व शासकीय योजनांबद्दल माहिती सांगितली जाणार आहे.
पाटखळ मंडळ येथील व तालुक्यातील नागरिकांना अधिकाधिक शासन योजनांची माहिती प्राप्त होऊन त्यांना योग्य लाभ घेता यावा.याबाबत नागरिकांमध्ये जागरुकता वाढावी, शासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्वास वृध्दींगत व्हावा, यासाठी विशेष मोहिम व लोकाभिमुख उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने महसूल दिनापासून ‘महसूल पंधरवडा’ साजरा करण्यात येत आहे.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपविभागीय अधिकारी बी.आर. माळी, तहसीलदार मदन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पाटखळ मंडळ अधिकारी श्रीमती एन.एच मौलवी यांच्या नेतृत्वाखाली पाटखळ तलाठी श्रीमती अर्चना लोखंडे, खुपसंगी तलाठी अजय जिरापुरे तलाठी, डोणज तलाठी रामदास खोमणे, खोमनाळ तलाठी दत्तात्रय फराटे तसेच पाटखळ मंडळातील कोतवाल बलभीम सावंत, प्रविण ढावरे, नितीन माळी, सरोजिनी कोळी, आप्पासो दोडके हे पार पाडणार आहेत. पाटखळ मंडळातील सर्व गावचे पोलीस पाटील परिश्रम घेत आहेत.
महसूल पंधरवड्यातील या कार्यक्रमाचा मंगळवेढा तालुक्यासह ग्रामीण भागातील सर्व दिव्यांग बंधु भगिनींनी लाभ घ्यावा असे आवाहान करण्यात आले आहे.
पाटखळ मंडलाधिकारी
श्रीमती एन.एच मौलवी