पोलिसांच्या पाटलागामुळे अपघात घडल्याची चर्चा , मंगळवेढ्यात भीमा व माण नदीतून महसूल व पोलिसांच्या आर्थिक लागे बंध्यातून अवैध वाळू मोठ्या प्रमाणात उपसा
.....
मंगळवेढा/प्रतिनिधी
मंगळवेढा तालुक्यात सद्या लिलाव बंद असल्याने भीमा व माण नदीतून महसूल व पोलिसांच्या आर्थिक लागे बंध्यातून अवैध वाळू मोठ्या प्रमाणात उपसा होत आहे ओझे वाडी येथून वाळू वाहतूक करणाऱ्या त्या वाहनचालकाचा येथील पोलिसांनी पाठलाग केल्याने भीतीपोटी वाहन चालवताना हा अपघात झाल्याची चर्चा अपघात स्थळी चर्चा होत होती पाठलाग करणाऱ्या त्या पोलिसांमध्ये तालुक्यातील वाळूची वसुली करणारा एक जण कार्यरत असल्याची चर्चा नागरिकांतून होत असून याप्रकरणी कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी या कामी योग्य ती चौकशी करून दोषी वर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
मंगळवेढा तालुक्यातील ओझेवाडी येथील माण नदी पात्रातून वाळू घेऊन जाणाऱ्या वाहनाचा पोलिसांनी पाठलाग केल्याने वाळूचे एन्ट्रा वाहन पलटी होऊन त्यामधील 26 वर्षीय युवक देवल उगाडे (रा.शिरगाव ता.पंढरपूर ) हा मेंदूला गंभीर इजा झाल्याने उपचार घेताना मयत झाला असून दुसरा युवक गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवेढा तालुक्यात उचेठाण रस्त्यावर गडदेवस्ती येथे दि.22 जुलै रोजी अडीचच्या सुमारास घडली आहे.

या घटनेची हकीकत अशी की दि. 22 रोजी ओझेवाडी येथील मान नदी पात्रातून अवैध रित्या वाळू घेवून गाडी निघाली होती.दरम्यान या भागात राऊंड मारणाऱ्या पोलिसांच्या निदर्शनास ही गोष्ट आल्याने या गाडीच्या मागे पोलिसांची गाडी लागल्यानंतर ते वाळूचे वाहन उचेठाण च्या दिशेने वेगाने जात होते.पोलिसांच्या भीतीपोटी सदर वाळूची गाडी गडदे वस्ती येथे पलटी होऊन त्यामध्ये शिरगाव ता.पंढरपूर येथील देवल सतीश उगाडे (वय 26) गणेश मस्के रा. शिरगाव ता.पंढरपूर हे दोन युवक मेंदूला गंभीर दुखापत झाल्याने त्या दोन्ही युवकांना मंगळवेढा येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते .उगाडे याची गंभीर परिस्थिती पाहून उपचारासाठी देवल उगाडे यास सोलापूर येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचार सुरू असताना तो मयत झाला. तसेच गणेश मस्के यास देखील मंगळवेढा येथून सोलापूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत. दरम्यान भीमा व माण नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू वाहतूक चालते. या वाहनाकडून एक पोलीस कर्मचारी मंथली गोळा करीत असल्याची खमंग चर्चा अपघातस्थळी रंगली होती. तो मंथली गोळा करणारा कोण? याचा कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी कसून शोध घेवून त्याच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी घटनास्थळी नागरिकामधून होत होती. ही घटना वसूलीच्या नादातूनच झाल्याची चर्चा उचेठाण परिसरात सुरु आहे.
दामाजी कारखाना चौकात उचेठान कडे बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्या येन्ट्रा गाडीला हात दाखवून पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु ते वाहन न थांबता भरधाव वेगाने गेल्यावर पुढे काही अंतरावर जावून पलटी झाल्याने हा अपघात झाला.पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला नाही या घटनेबाबत संबधित वाहन चांलकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
महेश ढवाण,
पोलिस निरीक्षक मंगळवेढा.