मंगळवेढा/प्रतिनिधी
मंगळवेढा तालुक्यात दुष्काळी परिस्थिती गंभीर असताना प्रत्यक्ष गावपातळीवर शेतकऱ्यांना आणि पशुधनाला पुरेसे पाणी व चारा उपलब्ध करून देण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शासनाने मदतीसाठी ठोस पावले उचलणे पाणीटंचाईग्रस्त गावांची प्रत्यक्ष पाहणी करणे आणि गरजेनुसार टँकरने पाणीपुरवठा करणे आवश्यक आहे.जनावरांसाठी चारा डेपो, चारा छावण्या किंवा इतर पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्याबाबतही तातडीने निर्णय होणे गरजेचे आहे. केवळ दुष्काळग्रस्त परिस्थितीची पाहणी करून किंवा आदेश काढून प्रश्न सुटणार नाही तर संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांपर्यंत मदत प्रत्यक्ष पोहोचली पाहिजे.शेतकऱ्यांच्या आक्रोशाची प्रशासन दखल घेणार का?खुपसंगी येथील शेतकऱ्यांना जनावरांसह ग्रामपंचायतीच्या दारात जाण्याची वेळ येत असेल तर ही परिस्थिती प्रशासनासाठी गंभीर इशाराच म्हणावा लागेल.
पाणी आणि चाऱ्याअभावी पशुधनाचे नुकसान होण्यापूर्वी संबंधित प्रशासनाने व अधिकाऱ्यांनी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे तहानलेल्या जनावरांना पाणी आणि चारा मिळणार कधी? शेतकऱ्यांच्या या आर्त हाकेला प्रशासन प्रतिसाद देणार का की शेतकऱ्यांना आपल्या जनावरांसह पाण्यासाठी आणखी संघर्ष करावा लागणार? याकडे खुपसंगी ग्रामस्थांसह संपूर्ण दक्षिण मंगळवेढा तालुक्याचे लक्ष लागले आहे. प्रशासनाचे तातडीने शेतकऱ्यांना पाणी व चाऱ्याचे नियोजन करावे.
