मतदारसंघात सौ.दिपाली आनंद ताड यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेय....
दिव्यप्रभात न्यूज नेटवर्क
पंचायत समिती संत चोखामेळानगर मतदारसंघात यंदाची निवडणूक केवळ उमेदवारांची नाही, तर विकास विरुद्ध दुर्लक्ष अशी बनली आहे. भाजपच्या दीपाली ताड आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या संगीता लेंडवे यांच्यात थेट सामना रंगत असून मतदारांच्या रोजच्या जगण्याशी निगडित प्रश्नच निकालाचा पाया ठरणार आहेत.
मतदारसंघातील ज्वलंत प्रश्न... संत चोखामेळानगर परिसरात गेल्या काही वर्षांत मूलभूत सुविधांचा प्रश्न चिघळलेला दिसतो.रस्त्यांची दुरवस्था खड्डेमय रस्त्यांमुळे अपघात आणि प्रवासाची गैरसोय पिण्याच्या पाण्याची टंचाई काही भागात पाणी टंचाई तसेच बेरोजगार तरुण वर्गला हाताला काम नसल्याने बेकरी वाढल्याचे दिसत आहे महामार्गावर महिला सुरक्षा व स्वच्छता सार्वजनिक स्वच्छतागृहे व प्रकाशयोजना अपुरी तीर्थक्षेत्र परिसर विकास रखडलेला भाविक येतात,पण सुविधा नाहीत मतदारांचं स्पष्ट मत आहे आश्वासनं नकोत, काम दिसलं पाहिजे.
सौ.दीपाली आनंद ताड (भाजप) संघटनशक्ती व प्रशासनिक पाठबळ.....
सौ.दीपाली आनंद ताड या भाजपच्या अधिकृत उमेदवार म्हणून संघटनशक्ती आणि वरच्या पातळीवरील सत्तेचं पाठबळ घेऊन मैदानात आहेत. त्यांची ओळख सक्रिय, संपर्कात राहणारी आणि महिलांच्या प्रश्नांवर बोलणारे नेतृत्व अशी आहे.त्यांची जमेची बाजू पक्षसत्ता असल्याने निधी खेचून आणण्याची क्षमता त्याच्या मध्ये आहे. महिला बचतगट,स्वच्छता व गावागावात मुला-मुलींसाठी अभ्यासिका वाचनालय तयार करून सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे स्वप्न साकार करण्याची जबाबदारी आरोग्य विषयांवर काम तसेच स्थानिक पातळीवर सतत भेटीगाठी मतदारांची अपेक्षा “ताड मॅडम जिंकल्या तर रस्ते, पाणी आणि तरुणांसाठी रोजगार यावर ठोस काम करणारा नेतृत्व आहे.
सौ.संगीता राजेंद्र लेंडवे (तीर्थक्षेत्र विकास आघाडी)स्थानिक प्रश्नांवर थेट आवाज....
सौ.संगीता लेंडवे या आघाडीच्या माध्यमातून स्थानिक पातळीवरील प्रश्नांवर थेट भूमिका घेणाऱ्या उमेदवार म्हणून समोर आल्या आहेत. त्यांचा भर तीर्थक्षेत्र विकास नागरिकांच्या दैनंदिन अडचणी आणि प्रशासनाविरोधातील नाराजी यावर आहे.त्यांची जमेची बाजू स्थानिक प्रश्नांवर आक्रमक भूमिका तीर्थक्षेत्र परिसरातील व्यापारी व नागरिकांचा पाठिंबा बाहेरचं नाही, आपल्या माणसाचं नेतृत्व अशी प्रतिमा मतदारांची अपेक्षा लेंडवे ताई निवडून आल्या तर थेट गावपातळीवर प्रश्न सोडवले पाहिजेत
खरी लढत कोण जिंकणार?
ही निवडणूक पक्षावर नाही तर कामगिरी आणि विश्वासार्हतेवर अवलंबून आहे. मतदार आता जात,पक्ष,गट यापलीकडे जाऊन कोण काम करणार? यावर विचार करत आहेत.या निवडणुकीत जिंकणारा उमेदवार तोच जो रस्त्यावर उतरेल फाईलवर नाही. कामावर भर देईल.संत चोखामेळानगरची जनता आता सजग झाली आहे.रस्ते,पाणी रोजगार आणि तीर्थक्षेत्र विकास असे अनेक विकासाचे मुद्दे निकाल ठरवणार आहेत.निवडणूक प्रचार जोरात असला तरी शेवटी मतपेटीत पडणारं बटन हे विकासाचंच असणार, हे निश्चित.
